Monday, April 18, 2011

काळेवाडी आघाडीचा निरंतर विजय !!!

'काळेवाडी' काय आहे हो काळेवाडी मध्ये म्हणाल तर पुणे शहराच्या अस्ताव्यस्त वाढी मधील एक कोणतेही खात पाणी घालता रस्त्याशेजारचे अशोकाचे झाड जसे वाढते तसे वाढलेला भाग ....त्या अशोकाच्या झाडाला तरी सम्राट अशोकाची महती आहे ( इतिहासवाला बरका , नाहीतर 'शारुकाचा' समजाल अर्थात तो चित्रपट देखील इतिहास जमाच झालाय म्हणा, करीना सोडून , थांबा आठवण करा त्या गाण्याची आता चला पुढे) इतिहासकार 'जहापान्हा' उर्फ अभिजित (सदस्य) यावर आणखी प्रकाश टाकतील . तर असला कुठलाही आगा पिछा नसलेल्या ह्या भागात 'आघाडी' , तुम्ही म्हणाल येड लागला का राव ? सदाशिव वगैरे पेठा सोडून हे काय मांडलाय पण मित्रानो आणि मैत्रिनिनो ही तर खरी मजा हाये ! अर्थात काळेवाडी आघाडी हे नाव प्राप्त झाले ते मात्र आमची हितचिंतक (बरोबर न ग ! ) नेहा देशपांडे यांच्यामुळे ....तर असो या भागात 'आघाडी' स्थापन झाली ...ती कशी हे पाहण्यासाठी या ठिकाणी टिचकी मारा ............

अश्या या काळेवाडी आघाडी चे किस्से तुम्ही या ब्लोग वर वाचले असतीलच जसे की, ते मध्यरात्री खिंडीत पकडून झुरळांचे केलेले शिरकाण , नवशिक्या disputed चा nanotechnology वरून केलेला 'राज्याशास्त्रीय ' फालुदा ,'सौंदर्याचा' कोलाज , धिंगाणा घालणारे वॉशिंग मशीन इत्यादि इत्यादी.. त्यावर मी जास्त काल विपर्यास करत नाही तर नमनाला एवढे घडाभर तेल लावल्यावर मुल मुद्द्याकडे येतो .....आज 'काळेवाडी आघाडीच्या' खऱ्या मालक-मालकिणीच्या ' आगमनाची नांदी होवू घातली आहे , त्यामुळे आघाडी सदस्यांना दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे त्यामुळे काळेवाडी आघाडी बंद पडणार की काय ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत, या पार्श्वभूमीवर येवू घातलेल्या भविष्यावर मी एक सिद्धांत मांडू इच्छित आहे... याला नित्या,अभ्या (दोन्ही), disputed , हडपसरचा हबशी , उत्साही शिवा आणि मन्यादेखील पाठींबा देईल.

तर मुद्दा असा आहे की काळेवाडी आघाडी बंद पडणार नाही ....हा काळेवाडी आघाडीचा अंत नाही...it is not an 'end of kalewadi aaghdi rather it is triumph of kalewadi aaghdi ' हा काळेवाडी आघाडीचा विजय आहे तुम्ही विचारलं कसे? अहो तोच तर सिद्धांत आहे....स्थान महात्म्य मान्य करून देखील मी असे सांगू इच्छितो की काळेवाडी आघाडी चेअस्तित्व तिच्या सदस्यामध्ये , त्यांच्या विचारांमध्ये आहे , काळेवाडी आघाडी मध्ये आम्ही राहिलेल्या दिवसांच्या आठवणी , तिथे निर्माण झालेल्या काही कल्पना आजही आम्ही सर्व जन बाळगून आहोत , ज्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलो होतो त्यामागचे विचार चालू ठेवणे , त्याचा पाठपुरावा करणे यातच काळेवाडी आघाडीचा विजय सामावलेला आहे....कोणी सांगावे आज पासून एक ते १० वर्षांनी भारताचे परराष्ट्र धोरणांच्या काही महत्वपूर्ण निर्णयामागे काळेवाडी आघाडीतील महामहीम सदस्य नितीन, मैत्रेय यांनी sandwich खाताना केलेली खलबते देखील असतील , येत्या काळात अभिषेक , अभिजित , निखील, शिवा कोणत्या क्षेत्रात असतील हे आताच सांगता येणार नाही मात्र जिथे कुठे ते असतील त्या त्या ठिकाणी अत्युच्च पातळीवर जाण्याचा ध्यास घेवून या आघाडीच्या विचारांचा वारसा निश्चितच त्यांचाकडे असेल. थोडक्यात काय थेसिस आहे काळेवाडीची समाप्ती त्याला anti -thesis आहे काळेवाडी चा विजय यातून जे synthesis येते आहे ते म्हणजे केवळ आज , आता नवे तर निरंतर काळेवाडीचा विजय म्हणजेच 'sustainable triumph ' ऑफ काळेवाडी आघाडी.

आता काहीना येथे मार्क्सवाद दिसेल कारण dilectical process येथे मांडली आहे पण मित्रानो त्यात हेगेल पण होता आणि मांडलेला सिद्धांत हा procedural पद्धतीचा आहे त्यामुळे त्यात उदारमतवाद ( liberalism ) पण आहे , तो sustainable असल्याने आणि अहिंसेवर आधारित असल्याने गांधीवाद देखील आहे त्यामुळे त्याला कोणत्या 'वादात' टाकायचे या वादात मी पडणार नाही पण जगन्मान्य या तीन वादांना एकत्रित आणणारा हा सिद्धांत आहे. यात केवळ राज्यशास्त्र किंवा सोशोलोजी नाही 'काळेवाडी' हे स्थान असल्याने त्यात भूगोल आहे , इतिहासच उल्लेख तर वर आलेलाच आहे . आघाडी ही प्रशासनिक नियमांनी चालत असल्याने आणि ती व्यवस्था सार्वत्रिक असल्याने 'लोकप्रशासन' आहे . येथे वाशिंग मशीन, टोस्टर , वेगवेगळ्या गाड्या असल्याने मेकॅनिकल पण समाविष्ट आहे , आणि मराठीत ब्लोग वगैरे लिहित असल्याने ललित का होईना पण मराठी साहित्य आहे. त्यामुळे सर्वाना कोळून पिणाऱ्या काळेवाडी आघाडीच्या 'निरंतर विजयाच्या' सिद्धांतावर शिक्कामोर्तब होतो. थोडक्यात सदस्य असे पर्यंत आघाडी ला मरण नाही .


आता या सिद्धांतावर चर्चेसाठी नोम चोम्स्की , फुको आणि इतर विचारवंत मंडळीना रान मोकळे आहे......करा चर्चा पण आफ्टर all its sustainable triumph of kalewadi aaghadi ...... !!!!!!!!!