राज ठाकरेंनी परवा औरंगाबादच्या सभेत आर. आर. पाटलांना उद्देशून 'सत्या'चा डायलॉग ऐकवला "मौका सभिको मिलता है!" वस्तुत : आम्हाला असे वाटते की हा रजनीकांतला देखील जैन बनवणाऱ्या कांद्याचा असावा, राज ठाकरे हे नाशिकमार्गे औरंगाबादेस गेले असावे आणि त्यावेळी लासालगावातील एरवी उपेक्षिलेली 'कांदे मंडळी' उच्चारवाने उपरोल्लेखित डायलॉग रस्त्यावरील आम आदमी पासून देशाच्या नामांकित अर्थतज्ञ राजकारणी आणि 'पावर'बाज जाणत्या राजाला ऐकवत असलेली त्यांना दिसली असावीत.
एरवी अतिपरिचयामुळे दुर्लक्षिलेला आपला हो नेहमीचा कांदा या विशिष्ठ क्षणी इंगा दाखवून जातोय ... एकेकाची वेळ असते अर्थात याच कांद्याने मागे एकदा सुषमा स्वराजांच्या केवळ डोळ्यातून पाण्यासोबत लाल दिव्याची गाडी काढून घेतल्याचा इतिहास फार जुना नाही . भाजप भारतीय संस्कृतीचा उदोउदो करत असला तरी ' कांदेनवमी'च्या रूपाने आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला कांदा त्यावेळी दुर्लक्ष केल्यामुळे सुषमाजींना निश्चित म्हणाला असेल मौका सभिको मिलता है!
मनमोहनजी हा इशारा ध्यानात घ्या उगाच " बडे बडे शहरो मै ऐसी छोटी छोटी बाते होती है !" असे म्हणून कांद्याकडे कानाडोळा करत असाल तर तुम्हाला देखील " अब दिल्ली बहोत दूर चली गयी " याचा अनुभव घ्यावा लागेल. आधीच युवराजांनी कांद्यावरून आलेल्या महागाईमुळे केलेल्या आघाडी बाबतच्या वक्तव्याने UPA ची बिघाडी होत आहे , आम्हाला वाटते आहे की कांद्याला मात्र आघाडीचे महत्व पटले असावे कारण त्याने टोमेटोशी संधान बांधले आहे आणि टोमेटोची लाली आम आदमीच्या भडकलेल्या चेहऱ्यावरून दिसू लागली आहे. इतर भाज्यांनी देखील भाजी आघाडीच्या या दोन नेत्यांना बाहेरून पाठींबा देवू केला आहे. डाळी, तेल, मोकळ्या जागा या समविचारी पक्षांनी देखील आघाडीशी संपर्क साधला असल्याचे आमच्या विश्वासू प्रतिनिधींनी आम्हाला देशभरातून कळवले आहे. त्वरेने पाऊले उचला अन्यथा ही महागाईची आघाडीमुळे 'आम आदमी का हाथ कॉंग्रेस के साथ ' म्हणण्याऐवजी कॉंग्रेस ला स्वत: चे हात चोळत बसावे लागेल.
आदर्श , २ G , राडिया, CWG यांनी खमंग फोडणी तयार केलीच आहे मतदार त्यावर कांदा- टोमेटोसहित UPA ला कढईत परतवत म्हणेल
....
......
........
आखिर मौका सभिको मिलता है !!!!!